Helpline: 8879 9397 12/ 13/ 14/ 15

महापौरांच्या हस्ते कॉम्प्यूटर विषयाच्या पुस्तक मालिकेचे प्रकाशन

दि. ११ जानेवारी २०१८ रोजी आमच्या मुलुंड (पश्चिम) येथील मुख्यालयामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महापौर  श्री. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते इयत्ता १ ली ते ८ वी च्या अभ्यासक्रमातील कॉम्प्यूटर (संगणक) विषयाच्या पुस्तक मालिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी माननीय महापौरांसह 

दै. सामनाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक श्री.विवेक कदम आणि प्रिंट प्रोडक्शनचे नॅशनल हेड श्री. संजय वाडेकर देखील उपस्थित होते.

     या वेळी श्री. महाडेश्वर यांनी आपल्या शिक्षक ते महापौर या प्रवासाबाबतच्या अनुभवांचे कथन केले, तसेच टार्गेट प्रकाशनाच्या भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी श्री. महाडेश्वर म्हणाले,  “जगातील सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे माणूस घडवणे. शिक्षण क्षेत्रातील कामातूनच हे साध्य करता येते. श्री. दिलीप सर आणि त्यांची टीम एक आदर्श माणूस घडवण्याचे काम करत आहे. पुस्तक प्रकाशनाच्या माध्यमातून टार्गेट प्रकाशन संवेदना जागृत ठेवण्याचे काम करत आहे. टार्गेटने लवकरात लवकर आपले ध्येय पूर्ण करावे यासाठी टार्गेट प्रकाशनाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.”

Mumbai Mayor Shri. Vishwanath Mahadeshwar